Vrukshavalli Amha Soyari is a very popular abhang by Sant Tukaram. Get Vrukshavalli Amha Soyari in Marathi Pdf Lyrics here and chant it with devotion of for the grace of Lord Vithoba or Panduranga.
Vrukshavalli Amha Soyari in Marathi – वृक्ष वल्ली आम्हां सोयरी
वृक्ष वल्ली आम्हां सोयरीं वनचरें ।
पक्षी ही सुस्वरें आळविती ।। 1 ।।
येणें सुखें रुचे एकांताचा वास ।
नाही गुण दोष अंगा येत ।। 2 ।।
आकाश मंडप पृथुवी आसन ।
रमे तेथें मन क्रीडा करी ।। 3 ।।
कंथाकुमंडलु देहउपचारा ।
जाणवितो वारा अवसरु ।। 4 ।।
हरिकथा भोजन परवडी विस्तार ।
करोनि प्रकार सेवूं रुची ।। 5 ।।
तुका म्हणे होय मनासी संवाद ।
आपुला चि वाद आपणांसी ।। 6 ।।